गल्ली क्रिकेट खेळताना सूर्यकुमार यादवने मारले ‘सुपला शॉट’, व्हिडीओ होत आहे व्हायरल

भारतीय संघ घरच्या मैदानावर 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी सूर्यकुमार यादवचा संघात समावेश करण्यात आला होता. मात्र, सूर्याचे कसोटी क्रिकेटमधील पदार्पण निराशाजनक ठरले. तो चांगला खेळण्यात अपयशी ठरला. मात्र, भारताने 2 सामने जिंकून 2-1 अशी आघाडी घेतली आहे. सूर्यकुमार यादवला पहिल्या कसोटीनंतर संघातून वगळण्यात आले असून तो सध्या विश्रांतीचा आनंद घेत आहे.
दरम्यान, मुंबई इंडियन्सने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये सूर्यकुमार यादव गल्ली क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेत आहे. यासोबतच या शॉटवर चाहत्यांनी लय भारी, एक नंबर भावा, मस्तच शॉट अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. आयपीएल आगामी हंगामाकडे वाटचाल करत आहे. या स्पर्धेचा थरार 31 मार्चपासून सुरू होणार आहे. आयपीएलचा पहिला सामना गतविजेता गुजरात जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे.
बघूया सूर्याचे सुपला शॉट-
The iconic…. 𝐒𝐮𝐩𝐥𝐚 𝐬𝐡𝐨𝐭 ft. सूर्या दादा 😍
📹: Roshan Singh#OneFamily @surya_14kumar pic.twitter.com/ohrBH8jbmG
— Mumbai Indians (@mipaltan) March 6, 2023