Breaking News
Home / बातम्या / काळ्या पैश्यातून उभा राहिलेला संगमनेरचा हा आलिशान बंगला सध्या चांगलाच चर्चेत आहे

काळ्या पैश्यातून उभा राहिलेला संगमनेरचा हा आलिशान बंगला सध्या चांगलाच चर्चेत आहे

राज्यात पेपरफुटीचे प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. एकामागोमाग एक अनेक परीक्षांचे पेपर फुटल्याचे समोर आले होते. तसेच याच म्हाडा पेपरफुटीचा तपास करताना टीईटी परीक्षेच्या गैरव्यवहाराची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी शिक्षण परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे व अभिषेक सावरीकर याना अटक केली. त्यांच्याकडे केलेल्या तपासात २०१८ मध्ये झालेल्या टीईटी परीक्षेत गैरव्यवहार झाल्याचे समोर आले.

या परीक्षेची जबाबदारी मुख्य आरोपी व जी. ए. सॉफ्टवेरचा संचालक डॉ. प्रितीश देशमुख याच्याकडे होती. त्याच्यासह तत्कालीन संचालक अश्विनकुमार, तत्कालीन आयुक्त सुखदेव डेरे, संतोष हरकळ, अंकुश हरकळ यांनी संगनमत करून गैरव्यवहार केल्याचे तपासात समोर आले.

राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त सुपे यांनी परीक्षा घेणाऱ्या जी. ए सॉफ्टवेअर कंपनीचा संचालक देशमुख याला हाताशी धरून टीईटी परीक्षेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला असून पुणे पोलिसांनी या घोटाळ्याचा पर्दाफाश केलाय. आरोग्य विभागातील भरती परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणाचा तपास करत असताना पुणे पोलिसांच्या हाताला पेपरफुटी प्रकरणातील हे मोठे मासे गळाला लागलेत.

2019-2020 मध्ये घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता (TET) परीक्षेत विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन निकाल बदलल्याचं उघड झालं होतं. या माध्यमातून जवळपास 4 कोटी 20 लाख रुपये जमा झाले होते. हे पैसे आरोपींनी आपआपसात वाटून घेतले. यात तुकाराम सुपे यांनी 1.70 कोटी, प्रितीश देशमुख 1.25 कोटी, अभिषेक सावरीकर 1.25 कोटी घेतले होते.दरम्यान याच घोटाळ्यात आणखी एक आरोपी सुखदेव डेरेच्या घरूनही करोडो रुपये पोलिसांनी हस्तगत केले होते.

सुखदेव डेरे हे परीक्षा परिषदेचे माजी आयुक्त आहेत. सुरुवातीपासूनच सुखदेव डेरे यांची कारकीर्द ही गैरव्यवहारांनी व वादांनी भरलेली आहे. अनेक शिक्षक संघटनांनी अनेक आंदोलने करून डेरेंनी केलेली नियमबाह्य नियुक्त्यांची प्रकरणे उघड केली होती. डेरेंनी नियमबाह्यमपणे अनेक शिक्षकांच्या पदाला मान्यता दिल्याचा आरोप डेरेंवर झालेला होता.

सध्या डेरे यांचा संगमनेर शहरात असलेला बंगला चांगलाच चर्चेत आहे. संगमनेर जवळील गुंजाळवाडी परिसरात डेरे यांचा “सुखयश निवास” हा बंगला आहे. आलिशान अशा या बंगल्याचे सोशल मीडियावर काळ्या पैशातून उभा राहिलेला बंगला म्हणून फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published.