प्रेरणादायी

कालपासून सोशल मीडियात व्हायरल झालेल्या या फोटोंमागची कहाणी जाणून भारावून जाल

प्रत्येक पालकाला आपल्या मुलाने शिकून मोठे व्हावे आणि स्वतःचे नाव कमवावे असे वाटते. मुलाच्या शिक्षणासाठि, आणि शिक्षण होऊन नोकरी लागेपर्यंत पालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. आईवडील आपल्या मुलासाठी स्वतःच्या पोटाला चिमटे घेऊन जगतात. तेव्हा कुठे मुले यशस्वी होतात. समाजात नाव कमावताना आणि लाखो रुपयांचे पॅकेज मिळू लागल्यावर मुलांनी त्यांच्या यशासाठी पालकांनी केलेले कष्ट कधीही विसरू नये.

मुलांसाठी भोगलेली संकटं किंवा करावे लागलेले कष्ट यामागे आई-वडिलांची फक्त एकच इच्छा असते ती म्हणजे आपल्या लेकरानं मोठं व्हावं. पालकांची दुसरी कोणतीही इच्छा नसते. ज्या आईमुळे आपण आज सुख-सोयी उपभोगत आहोत त्याची अनुभूती एकदा तरी आईलाही मिळावी यासाठी एका मुलानं उचललेलं पाऊल सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. कालपासून हे २ फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.

सिंगापूरमध्ये कामाला आणि वास्तव्याला असलेल्या दत्तात्रय नावाच्या मराठी तरुणानं आपल्या आईला सिंगापूरची सैर घडवली आहे. त्यांची लिंक्डइनवरील पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अवघं आयुष्या संसारात रमलेल्या आणि मुलासाठी अपार कष्ट सोसलेल्या आपल्या आईला त्यानं पहिल्यांदाच विमान प्रवास घडवला. थेट सिंगापूरला नेऊन त्यानं आईला आपण कुठं काम करतो ती कंपनीही दाखवली. लेकाची प्रगती पाहून आईला अश्रू अनावर झाले. या सर्व भावना दत्तात्रय यांनी आपल्या पोस्टमध्ये व्यक्त केल्या आहेत.

ग्रामीण भागातील मुले प्रचंड जिद्दी आणि महत्वाकांक्षी असतात. या मुलांना एखादी गोष्ट मिळाली नाही की ती मिळवायचा ते आटोकाट प्रयत्न करतात. त्यांचा संघर्ष कायम जवळचा वाटतो. थोडा का होईना आपण सर्वजण त्याचा भाग राहिलेलो असतो. लिंक्डइन वर दत्तात्रय यांनी टाकलेल्या पोस्टचा मराठी अनुवाद इथे बघूया..

काय लिहिलं आहे पोस्टमध्ये?

️माझ्या आईला जग दाखवायचे स्वप्न मी पूर्ण केले – दत्तात्रय

‘मी माझ्या आईला सिंगापूरचे सुंदर जग पाहायला घेऊन आलो. तिला येथील शहर आणि माझे ऑफिस दाखवले. आईचा आनंद आणि भावना मी शब्दात भावना व्यक्त करू शकत नाही. आपण विचार करू शकता की एखाद्या महिलेने आयुष्यभर गावात राहून काढले आणि विमान कधी जवळून पाहिलेले नाही. तिला सिंगापूर तिच्या मुलाने दाखवले.

आईच्या पिढीतील ती पहिली व्यक्ती आहे जिने परदेश प्रवास केला आणि गावातील दुसरी महिला जिने विमानाचा प्रवास केला. हा माझ्या कुटुंबासाठी खास क्षण होता. मला वाईट याचे वाटते की माझ्या वडिलांना परदेशातील प्रवासाचा अनुभव घेता आला नाही. मी लोकांना विनंती करेल की त्यांनी पालकांना सुंदर जग दाखवायला हवे. कदाचित याच घटनेमुळे त्यांचा आनंद गगनात मावणार नाही. मला सिंगापूरला यायच्या आधी आईला ते दाखवायचे होते. ते माझे प्रवास करण्याच्या आधीचे स्वप्न होते.

ही पोस्ट पहिल्यानंतर समजले की दत्तात्रय यांनी त्यांची मुळे कायमी जमिनीशी जोडून ठेवलेली आहेत. त्यांची पोस्ट पाहिल्यानंतर भावनाविवश व्हायला होते. पण अस काही करताना मनातून यायला हवे. आई, वडील आणि संघर्षाच्या प्रवासात सोबत असलेल्या माणसांसोबत चांगला काळ व्यतीत करावा, त्याहून चांगले क्षण आयुष्यात कदाचित दुसरे नसतील.’

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button