Breaking News
Home / बातम्या / ‘कल हो ना हो’ मधील हि गोंडस चिमुरडी सध्या काय करते? ती आता कशी दिसते?

‘कल हो ना हो’ मधील हि गोंडस चिमुरडी सध्या काय करते? ती आता कशी दिसते?

फिल्मी दुनियेत रोज नवनवीन कलाकार येतात आणि जातात. पण यात असंख्य असे कलाकार जे येतात तर मोठे स्वप्न घेऊन पण ते स्वप्न पूर्ण न करता अज्ञातवासात जातात. एकाच सिनेमातून असे अनेक कलाकार खूप प्रसिद्धी मिळवतात खरी पण ते नंतर कुठेच दिसत नाहीत.

आज अशाच एका स्टार बद्दल जाणून घेणार आहोत. शाहरुख खान आणि प्रीती झिंटाचा ‘कल हो ना हो’ हा सिनेमा तुम्ही बघितलाच असेल. या सिनेमात तुम्ही एक छोटी गोंडस मुलगी बघितली असेल. हि चिमुरडी तुमच्या लक्षात असेलच. हि चिमुरडी होती झनक शुक्ला. झनक शुक्ला ९० च्या दशकात प्रसिद्ध ‘करिश्मा का करिश्मा’ मालिकेत देखील दिसली होती.

अनेक दिवस चाललेल्या या शो मध्ये झनकच्या अभिनयाला खूप प्रेम मिळाले होते. झनकची त्याकाळची प्रसिद्धी बघून कोणीच विचार केला नसेल कि ती एक दिवस अशी गायब होईल. चला तर जाणून घेऊया झनक अध्या काय करते.

झनक सध्या आर्कियोलॉजिस्ट म्हणून काम करते. म्हणजेच ती पुरातत्व विषयात तज्ज्ञ म्हणून काम करते. नुकताच झनकचा एक व्हिडीओ वायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये ती सांगते कि शाहरुख खानच्या या सिनेमासाठी तिचं ऑडिशन खूप खराब झालं होतं. झनक ने कल हो ना हो मध्ये जिया कपूरची भूमिका निभावली होती.

याशिवाय झनकने इरफान खान सोबत डेडलाईन या सिनेमात देखील काम केलं होतं. देशभरात बालकलाकार म्हणून प्रसिद्ध झालेली हि चिमुरडी आता मोठी झालीये. जर तिचे तुम्ही आताचे फोटो बघितले तर तुम्हाला ती ओळखू देखील येणार नाही.

झनकने बालकलाकार म्हणून खूप काम केले आहे. पण तिच्या आईवडिलांना वाटत कि तिने अभिनयातून ब्रेक घ्यावा. त्यामुळे तिने ब्रेक घेतला आणि आपल्या आवडीच्या इतिहास विषयात अभ्यास सुरु केला. आज ती आर्कियोलॉजिस्ट म्हणून काम करतेय. एवढेच नाही तर तिने २४ व्या वर्षी लग्न देखील केलं आणि आता ती सेटल झाली आहे.

झनकची आई देखील अभिनय क्षेत्रात असून ती देखील टीव्हीवरील प्रसिद्ध चेहरा आहे. झनकच्या आईच नाव सुप्रिया शुक्ला आहे. त्या कुंडली भाग्य मध्ये सरला अरोराची भूमिका करतात.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *