Breaking News
Home / मनोरंजन / करण जोहरने केली कार्तिक आर्यनची हाकलपट्टी, बॉलीवूडमधील नेपोटिस्म प्रकरण पुन्हा चव्हाट्यावर

करण जोहरने केली कार्तिक आर्यनची हाकलपट्टी, बॉलीवूडमधील नेपोटिस्म प्रकरण पुन्हा चव्हाट्यावर

आपल्या सुपरहिट चित्रपट आणि हटके लुक्स मुळे सतत चर्चेत राहणारा बॉलीवूड चा चॉकलेट बॉय अभिनेता कार्तिक आर्यन पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरलाय. धर्मा प्रॉडक्शन्स च्या बॅनरखाली बनत असलेला दोस्ताना २ ह्या चित्रपटाच्या चालू शूटिंग मधून कार्तिक आर्यन ची हकालपट्टी करण्यात आली आहे.

दोस्ताना २ हा चित्रपट जॉन अब्राहम आणि अभिषेक बच्चन यांच्या दोस्ताना चित्रपटाचा दुसरा भाग आहे, दोस्ताना चित्रपट समीक्षकांनी चांगलाच उचलून धरला होता त्यामुळे दोस्ताना २ कडुन त्याच प्रकारच्या अपेक्षा होत्या; पण सुरुवातीलाच हा चित्रपट वादाच्या भोवर्‍यात सापडला.

कार्तिक आर्यन दोस्ताना २ चित्रपटाला घेऊन खूपच उत्साहित दिसत होता, चित्रपटाची जवळपास १५-२० दिवसाची शूटिंग पूर्ण झाली असतानाच, अचानक धर्मा प्रॉडक्शन्स ने दोस्ताना २ चित्रपटासाठी नवीन कास्टिंग करणार असल्याची घोषणा केली, आणि कार्तिक आर्यन ची हकालपट्टी ही बातमी निश्चित झाली.

कार्तिक चे सेटवरील नखरे, शूटिंगला उशीरा येणे, कार्तिक ला चित्रपटाच्या स्क्र‍िप्टबाबत असलेली नापसंती हे काही हकालपट्टी मागिल कारणे सांगितली जातात तसेच काहींच्या मते कार्तिक ची वाढती क्रेझ, सारा अली खान सोबत ची वाढती जवळीक, एक आऊटसाइडर करत असलेली प्रगती ही काही कारणे सांगितली जातात.

सुशांत सिंग राजपूत च्या आ त्मह त्या नंतर चर्चेचा विषय ठरलेला नेपोटिज्म ने पुन्हा एकदा वर डोके काढले, आधिच नेपोटिज्म ला सपोर्ट करत असल्याचे करण जौहर वर आरोप असताना पुन्हा एकदा करण जौहर ह्या वादात सापडला आहे, कार्तिक आणि करण जौहर च्या वादामध्ये कंगना राणौत ने उडी मारली असून तिने कार्तिक चा पाठराखण करत नेहमीप्रमाणे करण जौहर वर आरोप केले आहेत. आता ह्या वादाला एक वेगळे वळण लागले आहे. ह्या वादावर अद्याप कार्तिक ने कोणत्याच प्रकारचे स्पष्टीकरण दिले नाही.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *