नवीन खासरे

कपाटात जुने कागदं तपासताना सापडलं बुलेटचे १९८६ मधलं बिल, किंमत बघून हैराण झाला

Royal Enfield Bullet 350 ही दीर्घकाळापासून भारतातील सर्वात लोकप्रिय बाइक्सपैकी एक आहे आणि ती अजूनही 350cc सेगमेंटमध्ये खूपच लोकप्रिय आहे. अनेक वर्षांपासून बुलेट ग्राहकांच्या हृदयावर राज्य करत आहे. कालांतराने, कंपनीने गेल्या काही वर्षांत या बाईकमध्ये बरेच बदल केले आहेत, परंतु तिचा एकूण लुक पूर्वीसारखाच राहिला आहे. बुलेट क्लासिक ३५०cc गाडी बाइकप्रेमींना खूप आधीपासून वेड लावून आहे.

दरम्यान सध्या एक अशी गोष्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे जी पाहून बुलेटप्रेमी हैराण झाले आहेत. होय बुलेटचे एक जुनं बिल व्हायरल होत आहे. एका व्यक्तीला घरात जुने कागदपत्र तपासताना हे बिल निदर्शनास आले, त्याने ते सोशल मीडियावर शेअर केले. बघता बघता हे बिल प्रचंड व्हायरल झाले. कारण आहे या बिलावर असणारी बुलेटची किंमत. बुलेटच्या किमतीत आता प्रचंड वाढ झाली आहे. मग तेव्हा नेमकी बुलेटची किंमत होती किती हे जाणून घेऊया.

वास्तविक, 1986 मध्ये विकत घेतलेल्या रॉयल एनफिल्ड बुलेट 350 चे बिल सोशल मीडियावर समोर आले आहे आणि खूप व्हायरल होत आहे. या बिलात दाखवण्यात आलेल्या बाईकची किंमत पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. या बिलात बाइकची ऑन-रोड किंमत फक्त 18,700 रुपये होती, जी आजच्या तुलनेत जवळपास 10 पट कमी आहे. इंटरनेटवर व्हायरल होणारे हे बिल 36 वर्षांपूर्वीचे आहे. रॉयल एनफील्ड बुलेट 350 स्टँडर्ड मॉडेलचे व्हायरल बिल झारखंडमधील संदीप ऑटो कंपनीने जारी केलेले आहे. 1986 मध्ये रॉयल एनफील्ड बुलेटला फक्त एनफील्ड बुलेट म्हटले जात होते.

सवलतीनंतर 18,700 रुपयांची बुलेट

पोस्टनुसार, हे बिल 23 जानेवारी 1986 चे आहे. त्यात डीलरच्या नावासह त्याच्या स्थानाचा बोकारो (झारखंड) असा उल्लेख आहे. त्या वेळी 18,800 रुपये ऑन रोड किंमत असलेली 350 सीसी बुलेट मोटरसायकल सवलतीनंतर 18,700 रुपयांना कशी विकली गेली हे बिल दाखवते.

या बिलावर टिप्पणी करताना एका यूजरने लिहिले – आता एवढ्या पैशात बुलेटचे पार्ट्स येतात. दुसर्‍या युजरने लिहिले – एवढ्या पैशाचे माझ्या बाईकला एका महिन्यात पेट्रोल लागते. तिसर्‍याने लिहिले, आज बुलेटसाठी एका महिन्याचा ईएमआय एवढा आहे.

दुसर्‍या यूजरने लिहिले – त्यावेळचे 18 हजार आज 2 लाखांपेक्षा कमी होणार नाहीत. दुसरा वापरकर्ता म्हणाला – त्यावेळी एवढ्या पैशाने किमान 2 ते 3 एकर जमीन खरेदी केली जाऊ शकत होती.

भारतीय सैन्यानेही वापरल्या बुलेट

बर्‍याच लोकांना ही गोष्ट माहित नसेल की बुलेटचा वापर भारतीय सैन्यही करायचे. तेव्हाही ही बाईक खूप लोकप्रिय होती आणि एक विश्वासार्ह मोटारसायकल मानली गेली होती आणि भारतीय सैन्याने सीमा भागात गस्त घालण्यासाठी देखील वापरली होती.

650cc बुलेटची प्रतीक्षा

रॉयल एनफील्ड बुलेट ही कंपनीच्या पोर्टफोलिओमधील सर्वात जुनी आणि लोकप्रिय बाइक आहे. नुकत्याच समोर आलेल्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनी लवकरच भारतात 650cc इंजिनसह एक नवीन बुलेट लॉन्च करण्याची योजना आखत आहे. सध्या Royal Enfield Bullet फक्त 350cc आणि 500cc इंजिन पर्यायांसह उपलब्ध आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button