प्रेरणादायीबातम्या

कधीही निवडणूक न लढवता या माजी अधिकाऱ्याला मिळाले मोठे मंत्रिपद!

नरेंद्र मोदी यांनी ३० मे रोजी दुसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. मोदी यांच्यासोबत ५७ मंत्र्यांनीही शपथ घेतली. मागील सरकारमध्ये महत्वपूर्ण खाते सांभाळलेल्या अरुण जेटली यांनी स्वास्थाच्या कारणावरून मंत्रिपद न देण्याची विनंती केली होती. अरुण जेटलींसह सुषमा स्वराज आणि इतर काही मंत्र्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले नाही.मोदी सरकारमध्ये जास्तीत जास्त चेहरे ओळखीचे आहे. पण एक नाव असे देखील आहे जे बघून सर्व जण आश्चर्यचकित झाले असतील. हे नाव आहे माजी विदेश सचिव सुब्रमण्यम जयशंकर यांचं. जयशंकर यांना केवळ मोदी सरकारमध्ये स्थानच देण्यात आले नसून त्यांच्याकडे कॅबिनेट मंत्री म्हणून मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.

सुब्रमण्यम जयशंकर यांना विदेश मंत्रालयासारखे महत्वपूर्ण खाते देण्यात आले आहे. जयशंकर यांनी लोकसभा निवडणूक देखील लढवली नाहीये आणि ते राज्यसभेचे सदस्य देखील नाहीयेत. मोदी यांच्या मंत्रिमंडळात अनेक माजी अधिकारी आहेत पण कोणालाच थेट कॅबिनेट मंत्री बनवण्यात आले नव्हते. हे कदाचित पहिल्यांदाच घडले असेल कि एखाद्या माजी अधिकाऱ्याला त्याच्या अनुभवाच्या बळावर थेट कॅबिनेट मिनिस्टर बनवण्यात आले. आणि ते पण विदेश मंत्रालयासारखे महत्वपूर्ण खाते देण्यात आले.सुब्रमण्यम जयशंकर हे मूळचे तामिळनाडूचे आहेत. त्यांचा जन्म दिल्लीत झाला आणि बालपणहि दिल्लीत गेलं. त्यांचे वडील के सुब्रमण्यम हे देखील नामवंत अधिकारी होते. त्यांनी देशाच्या नुक्लियर प्रोग्राम, कारगिल रिव्ह्यू कमेटी आणि मनमोहन सिंह यांच्या कार्यकाळात रणनीती साठी बनवलेल्या टास्क फोर्समध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावली.

जयशंकर यांचे शिक्षण एअरफोर्स स्कुल आणि सेंट स्टीफन्स कॉलेजमध्ये झाले. त्यानंतर जयशंकर हे जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी मध्ये दाखल झाले. तिथे त्यांनी पोलिटिकल सायन्समधून MA ची डिग्री घेतली. खरेतर जयशंकर हे IIT दिल्ली मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी गेले होते. पण त्यांना JNU कॅम्पस मध्ये गर्दी दिसली आणि त्यांनी तिथेच ऍडमिशन घेऊन टाकले.

जयशंकर यांनी विदेश संबंधात एम.फिल ची डिग्री घेतली असून PhD देखील पूर्ण केली आहे. जयशंकर यांनी जपानी मूळच्या क्योको यांच्यासोबत लग्न केलं आहे. जयशंकर हे १९७७ मध्ये भारतीय विदेश सेवेचे अधिकारी बनले. ते १९८१ ते १९८५ मध्ये सेक्रेटरी राहिले. १९९६ ते २००० मध्ये जपान मध्ये ते राजदूत राहिले.त्यानंतर चेक रिपब्लिक मध्ये ते भारताचे राजदूत राहिले. तर २००९ ते २०१३ मध्ये त्यांनी चीनचे राजदूत म्हणून काम पाहिले तर त्यानंतर अमेरिकेत राजदूत बनवण्यात आले. त्यानंतर त्यांचा कार्यकाळ संपण्यास ७२ तास बाकी असताना त्यांना विदेश सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button