Breaking News
Home / बातम्या / कंगना पुन्हा बर ळली, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत केली अरे तुरेची भाषा

कंगना पुन्हा बर ळली, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत केली अरे तुरेची भाषा

मुंबई महापालिकेनं कंगनाच्या पाली हिलमधील कार्यालयावर आज बु लडोजर चालवत कारवाई केली. कंगनाने तिच्या या ऑफिसमध्ये अनधिकृत बांधकाम केलं होतं. तिला कालच या साठी मुंबई महापालिकेने नोटीस बजावली होती.

कंगनाने तिच्या या ऑफिसच्या बिल्डिंग मध्ये तळमजल्याजवळील शौचालयाच्या जागेत ऑफिससाठी केबिन, स्टोअर रूममध्ये अनधिकृतपणे स्वयंपाकघर, जेवणासाठी अनधिकृतपणे जागा तयार, जिन्याजवळ आणि तळमजल्याजवळच्या पार्किंग लॉटमध्ये दोन अनधिकृत शौचालये बांधली, पहिल्या मजल्यावर अनधिकृतपणे केबिन, देवघरातच बैठकीसाठी रूम, स्लॅब टाकून अनधिकृत शौचालय, पहिला मजला अनधिकृतपणे वाढवला होता.

शिवाय दुसर्‍या मजल्यावरील जिन्याच्या रचनेत बदल, बाल्कनीत फेरफार, स्लॅब टाकून मजल्याचा उभा विस्तार, शौचालय तोडून त्या जागेचा इतर गोष्टींसाठी वापर, बाजूच्या बंगल्यातील एक बेडरूम पार्टिशन तोडून स्वत:च्या बंगल्यात सामावून घेतला, बंगल्याच्या मुख्य गेटची दिशा बदलली होती.

दरम्यान कंगनाने उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर मुंबई महापालिकेकडून सुरू असलेल्या कारवाईला उच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. उच्च न्यायालयात सुनावणीला सुरुवात होण्याच्या काही वेळापूर्वीच पालिकेनं कंगनाच्या कार्यालयावरील कारवाई थांबवली होती.

यानंतर कंगनाने मुंबईत पोहचल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अनेक आ रोप करत एकेरी भाषेत उल्लेख करत टीका केली आहे. तिने एक व्हिडीओ पोस्ट करून हि टीका केली आहे.

‘उद्धव ठाकरे तुला काय वाटतं, तू बॉलिवूड मा फियांसोबत मिळून माझं घर उ ध्वस्त करून मोठा बदला घेतला आहेस? आज माझं घर मोडलं आहे, उद्या तुमचा हा अहंकार मोडून पडेल. वेळ नेहमी एकसारखी नसते. हे करून तुम्ही माझ्यावर खूप उपकार केले.. काश्मीरी पंडितांवर काय संकट आलं असेल हे माहीत होतं, परंतु आज मी ते स्वतः अनुभवलं. आज मी देशाला वचन देते की, मी फक्त अयोध्यावर नाही, तर काश्मीर पंडितांवरही चित्रपट तयार करणार. जय हिंद, जय महाराष्ट्र,” असं कंगनानं व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.

बघा व्हिडीओ-

दरम्यान कंगनाने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केल्याने सोशल मीडियात तिच्याविरुद्ध सं ताप व्यक्त होत आहे. यापूर्वी रिपब्लिकच्या अर्णब गोस्वामी यांनी देखील मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केला होता.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *