ओळख ना पाळख.. जग सोडून जाताना ७२ कोटींची संपत्ती संजय दत्तच्या नावावर करून गेली तरुणी

बॉलिवूड स्टार्स आणि त्यांच्या चाहत्यांच्या अनेक किस्से तुम्ही ऐकले असतील. हे चाहते आपल्या आवडत्या स्टार्ससाठी काहीही करायला तयार असतात. आपल्या आवडत्या सेलिब्रिटींच्या नावाचा टॅटू काढण्यापासून ते आपल्या प्रेमासाठी जीव धोक्यात घालण्यापर्यंतच्या अनेक घटना ऐकायला मिळतात. पण मृत्यूपूर्वी लाखोंची संपत्ती आपल्या आवडत्या स्टार्सच्या नावावर मृत्यूपत्रात करून गेल्याचे प्रकरण तुम्ही ऐकले नसेल. पण हे घडले आहे. होय, 2018 साली एका चाहतीने मृत्यूपूर्वी आपली सर्व संपत्ती संजू बाबाला म्हणजेच संजय दत्तला दिली होती. निशा पाटील असे या तरुणीचे नाव आहे. जाणून घेऊ तिने का हि संपत्ती संजय दत्तच्या नावावर केली.
एके दिवशी संजय दत्तला अचानक पोलिसांचा फोन आला. मुंबईतील मलबार हिल परिसरात राहणाऱ्या निशा पाटील या महिलेने तिचा संपूर्ण बँक बॅलन्स आणि मालमत्ता तुमच्या नावावर हस्तांतरित केल्याचे संजयला पोलिसांकडून सांगण्यात आले. हे ऐकून संजय दत्तला धक्काच बसला. निशा पाटील नावाच्या मुलीसोबत संजय दत्तची ओळख असण्याचा प्रश्नच नव्हता. संजयला काही कळायला मार्ग नव्हता. नंतर त्याला कळते की निशा त्याची फॅन आहे.
निशा ही संजय दत्तची खूप मोठी फॅन होती. आज ती या जगात नाही. गृहिणी असलेल्या निशा तिच्या भावंडांसोबत आणि तिच्या 80 वर्षांच्या आईसोबत राहत होती. प्रदीर्घ आजाराने 15 जानेवारी 2018 रोजी त्यांचे निधन झाले. मृत्यूपूर्वी तिने संजयला तिच्या बँक लॉकरमध्ये ठेवलेले सर्व दागिने आणि नोटांसह 72 कोटी रुपये देण्याचं ठरवलं होतं. निशाच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांसमोर मृत्यूपत्राचे वाचन करण्यात आले तेव्हा सर्वांनाच हा प्रकार कळला. तोपर्यंत निशाने तिची सर्व मालमत्ता संजय दत्तच्या नावावर हस्तांतरित केल्याचे कोणालाच माहीत नव्हते. निशाचा मृत्यू झाल्यानंतर सुमारे दोन आठवड्यांनंतर पोलिसांनी संजयला याबाबत माहिती दिली.
संजय दत्तने त्या संपत्तीचे काय केले?
त्याच्या एका चाहतीने तिच्या आयुष्यातील सर्व वैभव त्याला अर्पण केल्याचे ऐकून संजय भारावून गेला. पण संजय दत्त त्याच्या संपत्तीचे काय करणार होता? त्यांनी तत्काळ संबंधित बँकेशी संपर्क साधला आणि त्यानंतर निशा पाटीलची सर्व मालमत्ता तिच्या कुटुंबीयांकडे तातडीने हस्तांतरित करण्याची व्यवस्था केली. निशा आता या जगात नाही, पण संजय तिला कधीच विसरणार नाही.
सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे, 63 वर्षीय अभिनेत्याने त्यावेळी एक निवेदन जारी केले होते ज्यात असे लिहिले होते की, “अभिनेते म्हणून, आम्हाला चाहत्यांनी त्यांच्या मुलांचे नाव ठेवण्याची, रस्त्यावर आमचा पाठलाग करण्याची आणि आम्हाला कॉल करण्याची सवय आहे आणि चाहते भेटवस्तू देखील देतात. पण या फॅनने सगळ्या मर्यादा ओलांडल्या, मला धक्काच बसला. मी काहीही दावा करत नाही. मी निशाला ओळखत नव्हतो आणि या संपूर्ण घटनेने खूप भारावून गेलो आहे.”
संजय दत्तने या फॅनच्या कुटुंबाला कळवले कळवले होते कि तो या संपत्तीवर कोणताही दावा करणार नाही आणि मौल्यवान वस्तू कुटुंबाकडे परत हस्तांतरित करण्यासाठी आवश्यक असलेल्या कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेचे पालन करेल. निशा यांच्या मृत्यूनंतर जवळपास दोन आठवड्यांनी त्यांच्या दानाविषयी संजयला माहिती झालं होतं.
संजय दत्तला मात्र या चाहतीच्या इच्छेचं ओझं झालं. त्याने तातडीने बँक ऑफ बडोदाच्या वाळकेश्वर शाखेशी ईमेलने संपर्क साधला. निशा पाटील यांनी आपल्या नावे केलेली सर्व मालमत्ता संजय दत्तने त्यांच्या जवळच्या कुटुंबीयांकडे तातडीने हस्तांतरित होईल, याची काळजी बाळगली. त्यामुळे आपली संपत्ती लाडक्या सुपरस्टारला मिळावी, ही निशा यांची इच्छा एकप्रकारे अपूर्णच राहिली.