बातम्याराजकिय

एबी फॉर्म म्हणजे नेमकं काय असतं ?

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून उमेदवारांची तिकिटासाठी सुरु असणारी धावपळ आपल्याला बघायला मिळाली. प्रसंगी तिकिटासाठी पक्ष बदलण्याचेही प्रकार घडले. पक्षांनीही निवडून येण्याच्या शक्यतेवर अगदी काल परवा पक्षात आलेल्या नेत्यांना तिकीट देताना विचार केला नाही.

ज्यांना तिकीट मिळाले त्या सर्वांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. याकाळात कुठल्या उमेदवाराला पक्षाचा एबी फॉर्म मिळेल याची उत्सुकता होती. उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी हे एबी निवडणूक अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक असते. पण हे एबी फॉर्म म्हणजे नक्की असते तरी काय ? चला तर जाणून घेऊया…

एबी फॉर्म मधील A फॉर्म काय असतो ?

एबी फॉर्म हा एकच फॉर्म नसतो, तर A आणि B असे दोन वेगवेगळे फॉर्म असतात. मुळात आपल्या देशात विविध राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्ष आहेत. हे पक्ष त्यांचे अधिकृत म्हणुन काही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवत असतात. आपल्या या अधिकृत उमेदवारांना पक्ष A फॉर्म देत असतो, ज्यावर तिकीट वाटणाऱ्या अधिकृत पदाधिकाऱ्यांची सही असते.

या A फॉर्ममध्ये उमेदवाराचे नाव, पक्षामध्ये असणारे त्याचे पद आणि कोणत्या मतदारसंघातून तो अधिकृत उमेदवार आहे याबद्दल माहिती असते. A फॉर्म हा उमेदवाराला पक्षाचे निवडणूक चिन्ह मिळवण्यासाठी अधिकृत दस्तऐवज मानण्यात येतो.

B फॉर्म काय असतो ?

उमेदवारी अर्ज भरत असताना अधिकृत उमेदवाराला A अर्जासोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे, प्रतिज्ञापत्रे द्यावी लागतात. जर अधिकृत उमेदवाराच्या अर्जामध्ये छाननीवेळी काही त्रुटी आढळून आल्या, तर त्याचा अर्ज बाद होऊ शकतो. अशा प्रसंगी पक्षाचा कुणीतरी पर्यायी उमेदवार असावा म्हणून राजकीय पक्ष A फॉर्म सोबतच B फॉर्मही देत असतात.

या B फॉर्ममध्ये पहिल्या पसंतीच्या अधिकृत उमेदवारासह पक्षाच्या दुसऱ्या पर्यायी उमेदवाराचे नाव देण्यात आलेले असते. जर अधिकृत उमेदवाराचा अर्ज बाद झाला, तर हा पर्यायी उमेदवार संबंधित पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवतो. राज्यसभा आणि विधानपरिषदेसाठी हेच फॉर्म AA किंवा BB फॉर्म म्हणून ओळखले जातात.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button