Breaking News
Home / प्रेरणादायी / एखाद्या मॉडेलपेक्षा कमी नाहीये हि खासदाराची लेक, पहिल्याच प्रयत्नात बनली आहे IAS अधिकारी

एखाद्या मॉडेलपेक्षा कमी नाहीये हि खासदाराची लेक, पहिल्याच प्रयत्नात बनली आहे IAS अधिकारी

केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. पहिल्याच प्रयत्नात ही परीक्षा उत्तीर्ण होणे अत्यंत अवघड मानले जाते. पण हा पराक्रम अंजली बिर्ला हिने केला आहे. अंजलीने पहिल्याच प्रयत्नात यूपीएससीने घेतलेल्या नागरी सेवा परीक्षेत यश मिळविले आहे.

राजस्थानच्या कोटा येथे राहणारी अंजली बिर्ला ही एखाद्या मॉडेल किंवा अभिनेत्री पेक्षा कमी नाहीये. तिचे वडील ओम बिर्ला हे लोकसभा अध्यक्ष आणि खासदार आहेत. आई अमिता बिर्ला डॉक्टर असून मोठी बहीण आकांक्षा सीए आहे. मात्र असे असतानाही अंजलीने कुटुंबापासून दूर जाऊन स्वत:च्या पायावर उभे राहण्याचा निर्णय घेतला. ती अभ्यासात खूप हुशार होती शिवाय वाचनाचीही तिला आवड होती, पण नंतर तिने सायन्स किंवा कॉमर्स ऐवजी कला शाखा निवडून सर्वांना आश्चर्यचकित केले होते. खरे तर आयएएस अधिकारी होण्याचे तिचे स्वप्न होते. आता तिचे स्वप्नही पूर्ण झाले आहे.

अंजलीने पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण केली. तिचा 67 वा क्रमांक आला होता. महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात काम करण्याची तिची इच्छा आहे. लहानपणापासूनच तिला गरीब आणि महिलांसाठी काहीतरी करण्याची इच्छा होती. त्यामुळेच त्याने कला शाखेतून सोफिया स्कूलमधून बारावी उत्तीर्ण केली.

त्यानंतर तिने दिल्लीच्या रामजस कॉलेजमधून पॉलिटिकल सायन्स करायला सुरुवात केली. कॉलेजमध्ये ऑनर्सची पदवी घेतल्यानंतर तिने दिल्लीत राहून यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली.

अंजली सांगते की, पालक अनेकदा मुलाला विज्ञान किंवा गणित घ्यायला लावतात. पण त्याच्या बाहेरही एक जग आहे. तुम्हाला तुमचे ध्येय पहिल्यापासून माहित असले पाहिजे. मला आयएएस अधिकारी व्हायचे होते, त्यामुळे मी कला शाखेत प्रवेश घेऊन त्या दिशेने अभ्यास सुरू केला. मीही इतरांच्या सांगण्यावरून गणित किंवा विज्ञान घेतले असते तर आज मी या टप्प्यावर पोहोचले नसते.

अंजली सांगते की तिची मोठी बहीण आकांक्षा हिने इथपर्यंत पोहोचण्यात खूप मदत केली. जेव्हा ती निराश व्हायची तेव्हा दीदी तिला प्रेरीत करत असे. सीएचे काम पूर्ण केल्यानंतर ती सिव्हिल परीक्षेची तयारीही करत असे. तिनेच अंजलीला मुलाखत क्रॅक करण्याची रणनीतीही सांगितली.

अंजलीच्या या यशाने संपूर्ण कुटुंबाला तिचा अभिमान आहे. अंजली सांगते की, आयएएस अधिकारी झाल्यानंतर गरीब आणि गरजूंना मदत करणे हे तिच्या आयुष्याचे एकमेव ध्येय असेल. तिला समाजासाठी काहीतरी चांगले करायचे आहे.

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *