बातम्या

एक चूक आफताबला पडली महागात, या एका चुकीमुळे समोर आले श्रद्धाचे संपूर्ण प्रकरण

दिल्लीत झालेल्या तरुणीच्या हत्याकांडाने देशभरात एकच खळबळ उडाली आहे. हत्या केल्यानंतर आरोपीने मृतदेहाचे तुकडे करुन जंगलात फेकले. लग्नाचा तगादा लावत असल्याने लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहणाऱ्या प्रियकरानेच तिची हत्या केल्याचे उघड झाल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. हत्या झालेली श्रद्धा वालकर ही मूळची मुंबई जवळच्या वसईतील राहणारी आहे. मयत श्रद्धा आणि तिचा बॉयफ्रेंड आफताब मुंबईत एका कॉल सेंटरमध्ये काम करत होते. तेथेच त्यांची मैत्री झाली आणि मग मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. यानंतर दोघेही दिल्लीत शिफ्ट झाले आणि लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होते.

पालघरची रहिवासी असलेल्या श्रद्धा वालकरला प्रियकर आफताब अमीन पुनावालानं श्रद्धाला निर्घृणपणे संपवलं. तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केले. ते ठेवण्यासाठी एक फ्रिज आणला. आफताब श्रद्धाच्या मृतदेहाचा एक तुकडा घेऊन रोज रात्री २ वाजता घरातून निघायचा. मृतदेहाचा तुकडा जंगलात फेकून तो घरी परतायचा. श्रद्धाच्या हत्या प्रकरणात अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण देश हादरला आहे.

आफताब आणि श्रद्धाच्या प्रेम संबंधांना कुटुंबियांचा विरोध होता. श्रद्धाच्या कुटुंबियांनी तिला समजवण्याचा प्रयत्न केला. पण उपयोग झाला नाही. तिनं आफताबसोबत मुंबई सोडली. मे महिन्यात दोघे हिमाच प्रदेशात फिरायला गेले होते. त्यावेळी श्रद्धानं इन्स्टाग्रामवर एक रील शेअर केलं होतं. यानंतर दोघे दिल्लीला आले. १५ मे रोजी त्यांनी छतरपूरमध्ये एक फ्लॅट भाड्यानं घेतला. १८ मे रोजी दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. आफताबनं एका हातानं श्रद्धाचं तोंड दाबलं. तिनं ओरडण्याचा प्रयत्न केला. तितक्यात आफताबनं दुसऱ्या हातानं तिचा गळा आवळला. श्रद्धानं जीव सोडला.

आफताबनं श्रद्धाचा मृतदेह आधी बाथरुममध्ये ठेवला. नंतर त्यानं एक फ्रीज खरेदी केला. श्रद्धाच्या मृतदेहाचे त्यानं करवतीनं ३५ तुकडे केले. ते फ्रीजमध्ये ठेवले. रोज एक तुकडा पिशवीत भरून रात्री २ वाजता आफताब निघायचा. मृतदेहाचा तुकडा जंगलात फेकून द्यायचा. कित्येक दिवस हा घटनाक्रम सुरू होता. या कालावधीत आफताब सामान्य आयुष्य जगत होता. त्यानं श्रद्धा वापरत असलेल्या क्रेडिट कार्डची बिलं भरली. क्रेडिट कार्ड कंपन्यांनी श्रद्धाच्या मुंबईतील पत्त्यावर संपर्क साधू नये म्हणून त्यानं बिलं भरून टाकली.

कॉल सेंटरमध्ये काम करत असलेल्या श्रद्धाची हत्या १८ मे रोजी झाली. मात्र ९ जूनपर्यंत तिचं इन्स्टाग्राम अकाऊंट ऍक्टिव्ह होतं. श्रद्धाच्या मित्रमैत्रिणींच्या मेसेजेसना आफताब उत्तरं देत होतं. त्यामुळे श्रद्धा फोन घेत नसली तरीही मित्र परिवाराला तिची माहिती मिळत होती. मेसेजेसना रिप्लाय येत होते. मात्र ९ जूनपासून रिप्लाय थांबले. श्रद्धाचं अकाऊंट इनऍक्टिव्ह झालं आणि मित्रांना शंका आली.

श्रद्धाच्या नियमित संपर्कात आलेल्यांना मेसेजेसचे रिप्लाय मिळत नसल्यानं त्यांना शंका आली. काहींनी तिच्या वडिलांशी, भावाशी संपर्क साधला. वडिलांनी पोलीस ठाणं गाठलं. सुरुवातीला आफताबनं पोलिसांची दिशाभूल केली. आपण बऱ्याच कालावधीपासून श्रद्धाच्या संपर्कात नसल्याचं त्यानं सांगितलं. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच आफताबनं तोंड उघडलं आणि धक्कादायक हत्याकांडाचा पर्दाफाश झाला.

श्रद्धा ही वसईतील रहिवासी

श्रद्धा वालकर ही तरुणी वसईतील संस्कृती अपार्टमेंट या इमारतीमध्ये पाचव्या मजल्यावर राहत होती. श्रद्धाचे कुटुंबीय हे वसईतील मूळ रहिवाशी आहे. श्रद्धाचे बालपण याच संस्कृती अपार्टमेंटमधील पाचव्या मजल्यावरील घरात गेले आहे. तिच्या घरात वडील आणि भाऊ राहतात.

वसई गावातील जिजी कॉलेजच्या बाजूला संस्कृती अपॉईंटमेंट आहे. या अपॉईंटमेंटमध्ये श्रद्धा वालकर आपल्या कुटुंबासोबत राहत असताना 2019 मध्ये मालाड येथील एका कॉल सेंटरमध्ये काम करीत होती. याचवेळी वसई दिवणमान येथील आफताब पुनावाला या तरुणासोबत तिचे प्रेमसंबंध जुळले होते.

घरच्यांचा प्रेमसंबंधाला विरोध होता
हे प्रेमसंबंध जुळल्याचे तिने आपल्या घरी सांगितल्यावर घरच्यांनी तिला विरोध केला होता. पण घरच्यांचा विरोध झिडकारुन श्रद्धा ही तिचा प्रियकर आफताब पुनावाला यांच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये वसईतील नायगाव परिसरात रहायला गेली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button