कोरोनाच्या महामारीने संपूर्ण जगाला संकटात आणले होते. संपूर्ण जग काही काळासाठी पूर्णतः थांबून गेलं होतं. असं असताना देखील अर्थचक्र मात्र थांबलं नाही. कोरोनाच्या महामारीतही कित्येक लोकांनी कमालीचे पैसे कमावले. यामध्ये भारतीय उद्योजकांचा देखील समावेश आहे.
सन फार्मास्युटिकल्स इंडस्ट्रीजचे संस्थापक अध्यक्ष दिलीप संघवी हे त्यातीलच एक नाव आहे. सनफार्मा या जगातील आघाडीच्या औषध कंपन्यांपैकी एक मजबूत बाजार भांडवल असलेली कंपनी आहे. कोरोनाकाळात या कंपनीने आपला व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढवला होता. त्यामुळे दिलीप सांगवी यांच्या संपत्तीत देखील लक्षणीय वाढ झाली.
फोर्ब्जने नुकतीच भारतामधील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. सन फार्माचे दिलीप संघवी हे सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिल्या दहा नावांमध्ये आहेत. फोर्ब्जच्या माहितीनुसार संघवींची संपत्ती ११ बिलियन डॉलर्स आहे.
दिलीप संघवी हे फार्म्युसिटिकल डिस्ट्रिब्युटरचा मुलगा आहे. वडिलांकडून २०० डॉलर्स उसने घेऊन त्यांनी फार्मा क्षेत्रात प्रवेश केला होता. १९८२ मध्ये १०,००० रुपयांसह गुजरातमधील वापी येथे सन फार्मा कंपनीची सुरुवात त्यांनी केली होती. सुरुवातीच्या काळात कंपनीने जास्त औषधे न बनवता चांगल्या प्रतींच्या औषधांवर लक्ष केंद्रित केले.
त्यानंतर या कंपनीचा जागतिक स्तरावर मोठा विस्तार झाला. आज अमेरिकेतही सन फार्मा प्रबल झालेली दिसत आहे. गेल्या काही दिवसांत कोरोनाच्या महामारीमुळे शेअर मार्केट काहीसे मंदीत होते.
असे असतानाही दिलीप संघवी यांच्या सन फार्माने लोकांना चांगले पैसे कमवून दिले आहेत. आजही सॅन फार्मच्या शेअर्सने लांब उडी घेतली आहे आणि अत्यंत तेजीत आहे.