उद्धव ठाकरे म्हणाले “मुंबईवर राग काढू नका”; देवेंद्र फडणवीसांनी दिलं एका वाक्यात उत्तर

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतरही राजकीय घडामोडींचा वेग कमी होताना दिसत नाही. पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत, नवीन शिंदे सरकारने राज्याच्या महाधिवक्ता यांना मुंबई मेट्रोचे कारशेड आरेमध्ये करण्यासाठी न्यायालयात भूमिका मांडण्याचे निर्देश दिले. यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आक्षेप घेतला. त्यामुळे आता आरोप होऊ लागले आहेत. उद्धव ठाकरे म्हणाले माझा राग मुंबईवर काढू नका. उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई मेट्रोच्या आरे येथील कारशेडवरून भाजप आणि शिवसेना यांच्यात सतत संघर्ष सुरू असल्याचे दिसून आले आहे. शिवसेना भवनात आज उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. नव्या सरकारच्या स्थापनेच्या पद्धतीवरही त्यांनी जोरदार मत व्यक्त केले. आरे कारशेडबाबत घेतलेल्या निर्णयावरही नाराजी व्यक्त केली. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरेंना उत्तर दिलं आहे.
आम्ही योग्य तो निर्णय घेऊ. मेट्रो कारशेडच्या मुद्द्यावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरे यांचा आदर आणि मुंबईकरांचे हित लक्षात घेऊनच निर्णय घेऊ. तत्पूर्वी, आरेमध्येच जेव्हा पुन्हा एकदा कारशेड होण्याबाबत निर्देश देण्यात आले. तेव्हा मला वाईट वाटले. आरेमध्येच कारशेड होण्याचा हट्ट धरू नका, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते.
तुमचा माझ्यावर राग असेल तर ठीक आहे. पण माझा राग मुंबईवर काढू नका. मुंबई मेट्रोचे आरे कारशेड पर्यावरणासाठी योग्य नाही. यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होणार आहे. ही जागा निश्चित झाली. एकाच रात्रीत शेकडो झाडे तोडण्यात आली. कारशेड झाल्यास तेथील वन्यजीव व वनजीवनाला मोठा धोका निर्माण होणार आहे.
आता तेथे कारशेड झाल्यास ते पुढे पुढे वाढत जाईल आणि आरेचे अस्तित्वच धोक्यात येऊ शकते. माझ्या पहिल्या कॅबिनेटने पर्यावरणाचा विचार करून आरेतील मुंबई मेट्रोच्या कारशेडचा निर्णय स्थगित केला होता. कांजूरमार्गचे स्थान अनेक अर्थांनी चांगले आहे. त्यामुळे कांजूरमार्ग जागेचा प्रस्ताव नाकारू नका, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना आरेमध्ये मेट्रो कारशेड उभारण्याचा निर्णय घेतला होता. तेथे कामही सुरू झाले होते. मात्र, शिवसेनेच्या विरोधामुळे मुख्यमंत्री होताच आरेऐवजी कांजूरमार्गावर मेट्रो कारशेड होईल, असे निर्देश उद्धव ठाकरे यांनी दिले. मात्र, या जमिनीवर केंद्र सरकारचा दावा होता. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले. याला भाजपने कडाडून विरोध केला. यानंतर आरेमध्येच मेट्रो कारशेड बांधण्यात येईल, असे निर्देश महाराष्ट्र सरकारने राज्याच्या महाधिवक्ता यांना दिले आहेत. यासंदर्भात सरकारची बाजू न्यायालयात मांडण्यात यावी, असे सांगण्यात आले आहे.
अधीक वाचा-
शिंदेंचे मुख्यमंत्री पद टिकवण्यासाठी उदय सामंत यांनी केलं एक सूचक ट्विट, पहिल्याच दिवशी मिळालं..
फडणवीसांना मुख्यमंत्रीपदापासून दूर केल्याने भाजपमध्ये प्रचंड नाराजी, बॅनरवरून अमित शहा गायब
शिंदे सरकारची संभाव्य मंत्रिमंडळ यादी आली समोर, जाणून घ्या कोणाला मिळणार मंत्रिपद