Breaking News
Loading...
Home / नवीन खासरे / चहा विकण्यासाठी सोडलं होतं कलेक्टर होण्याचं स्वप्न, आज वर्षाला करतोय १०० कोटींची उलाढाल

चहा विकण्यासाठी सोडलं होतं कलेक्टर होण्याचं स्वप्न, आज वर्षाला करतोय १०० कोटींची उलाढाल

आजकालच्या मुलांचा पदवीच्या शिक्षणानंतर सरकारी खात्यांमध्ये भरती होणाऱ्या परीक्षेंसाठी म्हणजेच स्पर्धा परीक्षांकडे वळण्याचा कल वाढलेला आहे. मात्र प्रत्येक जण परीक्षेमध्ये पास होईलच असे नाही. स्पर्धा परीक्षांमध्ये आलेल्या अपयशामुळे अनेक जण खचून जातात तर काही जण मानिसक दबावाखाली येऊन आत्महत्या करतात अशी कित्येक उदाहरणे आपल्या आसपास आहेत.

अशीच एक कहाणी आहे अनुभव आणि आनंद या तरुण उद्योजकांची. आनंद नायक आणि अनुभव दुबे हे सध्याच्या काळात देशातील तरुण उद्योजकांमध्ये झपाट्याने पुढे येत असलेले नाव आहे. त्यांनी सुरु केलेल्या चाय-सुट्टा या चहाचे देशभरात १६५ आउटलेट आहेत. परदेशात देखील त्यांनी ५ आउटलेट सुरु केले आहेत. आनंद आणि अनुभव यांची व्यवसायातील वार्षिक उलाढाल तब्ब्ल १०० कोटींच्या वर आहे.

Loading...

पदवीचे शिक्षण घेण्यासाठी अनुभव इंदोरला गेले होते. शिक्षण घेत असताना त्याची ओळख आनंद याच्याशी झाली. काही काळानंतर आनंदने अभ्यास सोडून दिला आणि व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. अनुभवने प्रशासीय अधिकारी परीक्षेच्या तयारीसाठी थेट दिल्ली घातली. सर्वकाही सुरळीत चालू असताना एक दिवस अचानक अनुभवला आनंदचा फोन आला आणि व्यवसायात नुकसान झाले आहे असे त्याने सांगितले.

अनुभवचे देखील अभ्यासात मन लागत नसल्याने त्याने व्यवसायात उतरण्याचे ठरवले. दोघांनी मिळून तरुण वर्गाला आकर्षित करण्याचे ठरवले आणि चहाचा व्यवसाय सुरु केला. आयएएसचा अभ्यास सोडून थेट चहाचा व्यवसाय टाकल्याने नातेवाईकांनी दोघांच्याही घरच्यांना टोमणे मारायला सुरुवात केली.

पावसाचा महिना सुरु झाला आणि दुकानासमोर गर्दी वाढायला लागली. गर्दी इतकी झाली की व्यवसाय वाढवावा लागला. ३ लाखांमध्ये सुरु झालेला व्यवसाय थेट १०० कोटींच्या उलाढालीवर गेला. ” पैसे के सामने तो दुनियाभी झुकती है ” या उक्ती प्रमाणे नातेवाईक काय तर सगळ्यांचीच तोंडे गप्प पडली.

Loading...

अनुभव आणि आनंदला व्यवसायात भरारी मिळाली ती सोशल मीडियामुळे. त्यांच्या दुकानाचे फोटो हे सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असल्यामुळे लोकांचे ‘चाय-सुट्टा’ बद्दल आकर्षण वाढत गेले. तरुणांनी फक्त सरकारी नोकरीच्या मागे धावायला पाहिजे असा कोणताही नियम नाही. तुम्ही अनेक क्षेत्रांमध्ये आपल्या आवडीनिवडीनुसार काम करू शकता. सुरुवातीच्या काळात संघर्ष अटळ आहे. मात्र नंतर स्वर्गाची अनुभवती, याच जन्मात तुम्हाला कामाच्या रूपाने श्रीमंती अनुभवायला मिळणार हे मात्र नक्की.

Loading...

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *