मनोरंजन

आता सैराटचा रेकॉर्ड तुटणार, रितेश-जिनिलियाच्या ‘वेड’ चित्रपटात करण्यात आले हे मोठे बदल

रितेश देशमुख दिग्दर्शित ‘वेड’ या चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांना वेड लावले आहे. चित्रपटाची कमाई 50 कोटींच्या पार गेली आहे. वेडची कथा, गाणी, संवाद प्रेक्षकांच्या मनाला भिडले आहेत. रितेश-जेनिलियाच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीने चाहत्यांची मने जिंकली आहेत. अशा परिस्थितीत वेड चित्रपटाच्या टीमने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे ‘वेड’ या चित्रपटाच्या निमित्ताने कलाविश्वात पहिल्यांदाच असे घडणार आहे. या चित्रपटात काही बदल करण्यात आले आहेत. रितेशने एक व्हिडिओ शेअर करून प्रेक्षकांना याबद्दल सांगितले आहे.

थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर कोणत्याही चित्रपटात आजपर्यंत नवीन गाणे समाविष्ट केलेले नाही. मराठीच नव्हे तर बॉलिवूड किंवा टॉलिवूडमध्येही असं घडलं नव्हतं. पण ‘वेड’ चित्रपटात आता सत्या (रितेश देशमुख) आणि श्रावणी (जेनिलिया देशमुख) यांच्या ‘वेड तुझं’ गाण्याच्या नव्या व्हर्जनचा समावेश करण्यात येणार आहे. यासोबतच तीन नवे सीनही शूट करण्यात आले असून त्यांचा त्यात समावेश करण्यात आला आहे.

20 जानेवारीपासून प्रेक्षकांना ‘वेड’चं हे नवीन व्हर्जन चित्रपटगृहांमध्ये पाहता येणार आहे. वेडया चित्रपटातून रितेश आणि जेनेलिया बऱ्याच वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर एकत्र दिसले. या दोघांना मोठ्या पडद्यावर एकत्र पाहून प्रेक्षक पुन्हा एकदा त्यांच्या केमिस्ट्रीच्या प्रेमात पडले. या चित्रपटातील ‘वेड तुझं’ हे गाणे यापूर्वी रितेश आणि जिया शंकर यांच्यावर चित्रित करण्यात आले होते. त्या गाण्यानेही प्रेक्षकांवर जादू केली.

चित्रपटात करण्यात आले हे बदल

रितेशने सांगितलं की, “वेड चित्रपटात काही बदल करण्यात आले आहेत.” तो म्हणाला की, ‘काही लोक आम्हाला म्हणत होते की, सलमान भाऊचं गाणं चित्रपटाच्या शेवटी आहे, ते चित्रपटाच्यामध्ये असलं पाहिजे तर आता ते गाणं चित्रपटाच्यामध्ये आहे. तसेच सत्या आणि त्याचे वडील, श्रावणी आणि अशोक मामा यांचे काही नवे सीन्स देखील चित्रपटात दाखवण्यात येणार आहेत. त्यामुळे 20 जानेवारीपासून तुम्ही वेड या चित्रपटाचं एक्सटेंडेट व्हर्जन चित्रपट गृहात पाहू शकता.” शुक्रवारी सिनेमा लव्हर्स-डे आहे. याननिमित्ताने तुम्ही 99 रुपयांमध्ये वेड चित्रपट पाहू शकता. ‘

वेड या चित्रपटामधील वेड लागलंय, सुख कळले, बेसुरी या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. या चित्रपटात रितेश आणि जिनिलिया यांच्यासोबतच अशोक सराफ (Ashok Saraf), विद्याधर जोशी तसेच अभिनेता शुभंकर तावडे आणि जिया शंकर या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे.

‘वेड’ने मोडला ‘सैराट’चा रेकॉर्ड

‘वेड’ला प्रेक्षक आणि समीक्षकांनीच दाद दिली नाही, तर बॉक्स ऑफिसवरही भरपूर कमाई केली. या चित्रपटाने आतापर्यंत 50 कोटींहुन अधिकची कमाई केली आहे. नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ या 2016 च्या चित्रपटानंतर हा चित्रपट सर्वाधिक कमाई करणारा ठरला आहे. रितेशचा ‘वेड’ हा 2019 मध्ये आलेल्या ‘मजिली’ या चित्रपटाचा रिमेक आहे. शिवाय एका दिवसात सर्वात जास्त कमाईचा मराठीतला सैराटचा विक्रमही वेडने मोडला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button