Breaking News
Loading...
Home / बातम्या / आता या मोठ्या अभिनेत्रीच्या घरी पडली NCB ची धाड, सापडला गांजा..

आता या मोठ्या अभिनेत्रीच्या घरी पडली NCB ची धाड, सापडला गांजा..

बॉलिवूडमध्ये मागील अनेक दिवसांपासून चौकशीचे फेरे सुरु आहेत. अनेक दिग्गज अभिनेत्यांची मागील काही दिवसात चौकशी झाली. तर अनेक अभिनेत्यांची अजूनही चौकशी सुरु आहे. आता अजून एक मोठ्या अभिनेत्रीच्या घरी छापेमारी झाली असून घरात गांजा सापडल्याने खळबळ उडाली आहे.

नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या मुंबई झोनल युनिटने कॉमेडियन अभिनेत्री भारती सिंह आणि तिचा नवरा हर्ष यांच्या घरी छापा टाकला. अंधेरी, लोखंडवाला आणि वर्सोवा भागात एनसीबी छापे टाकत आहे.

Loading...

एबीपी न्यूजच्या रिपोर्टनुसारपकडलेल्या अटकेत असलेल्या ड्रग्स पॅडलरकडून मिळाल्या माहितीनुसार भारतीसिंग आणि हर्ष लिंबाचियाच्या घरी छापा टाकण्यात आला. छापा दरम्यान एनसीबीला एक संशयास्पद पदार्थ (गांजा) सापडला आहे.

बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींचे या प्रकरणात आतापर्यंत नाव आले आहे. सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीपासून दीपिका पादुकोण, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह यापासून ते अर्जून रामपाल पर्यंत अनेकांची चौकशी झाली. अजूनही एनसीबीची ही करावाई सुरु आहे.

कोण आहे भारती सिंह?

भारती सिंह हि स्टँडअप कॉमेडियन आणि अभिनेत्री आहे. ती द कपिल शर्मा शो मध्ये नेहमी दिसते. भारतीने २०१७ मध्ये हर्ष लिंबचिया सोबत लग्न केलं आहे. तिने आतापर्यंत अनेक हिट कॉमेडी शो मध्ये काम केलं आहे. तिने इंडियन लाफ्टर चैलेंज मध्ये सर्वात अगोदर काम केले होते.

भारती सिंह ने कॉमेडी सर्कस, कॉमेडी सर्कस महासंग्राम, कॉमेडी सर्कस का जादू, कहानी कॉमेडी सर्कस की आणि कॉमेडी नाइट्स बचाओ या शो मध्ये काम केलं आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Loading...

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *