Breaking News
Home / बातम्या / ..आणि संतापलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याने तरुणीच्या कानशिलात लगावली, व्हिडीओ व्हायरल

..आणि संतापलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याने तरुणीच्या कानशिलात लगावली, व्हिडीओ व्हायरल

गाडी पकडल्यानंतर पोलिसांशी हुज्जत घालणे हे काही नवीन राहिले नाही. अनेकदा अशा गोष्टी समोर येत असतात. कर्नाटकमधील एका तरुणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नो पार्किंग मध्ये गाडी लावल्यामुळे पोलीस तरुणीवर कारवाई करतात. पण तरुणी मात्र त्यांच्याशी हुज्जत घालते.

या अल्पवयीन तरुणीला हुज्जत घालताना या महिला पोलीस कर्मचाऱ्याने कानशिलात लगावली. उपस्थितांनी याचा व्हिडीओ बनवला आणि तो बघता बघता वायरल झाला. तरुणीने कोणाला तरी कॉल करण्याचा प्रयत्न केला पण तिला मात्र हुज्जत घालणे महागात पडले.

पोलिसांनी या तरुणीची गाडी जप्त केल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. मुलगी अगोदर गाडीवर बसून बोलते. पण बोलताना एका कर्मचाऱ्याचा पारा चढतो आणि ती तरुणीच्या कानशिलात लगावते. या तरुणीला नंतर पोलीस स्टेशनला नेऊन अल्पवयीन असल्याने सोडून देण्यात आले.

बघा व्हिडीओ-

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *