Breaking News
Home / बातम्या / आज सुध्दा इंग्रजाच्या ताब्यात आहे महाराष्ट्रातील हि रेल्वे, वापरा करिता द्यावे लागतात करोडो रुपये..

आज सुध्दा इंग्रजाच्या ताब्यात आहे महाराष्ट्रातील हि रेल्वे, वापरा करिता द्यावे लागतात करोडो रुपये..

भारताला स्वतंत्र मिळून ७३ वर्ष झाली आहेत. परंतु आजही आपली एक गोष्ट इंग्रजाच्या ताब्यात आहे. काही लोकांना माहिती असेल कि महाराष्ट्रातील एक रेल्वे आजही इंग्रजाच्या ताब्यात आहे. या रेल्वेची सेवा देण्याचे काम आजही ब्रिटन मधील एक प्रायवेट कंपनी करत आहे. भारतात असून भारताचा नसलेला हा रेल्वे ट्रेक आहे शंकुतला एक्स्प्रेसचा ज्यावर एक पेसेन्जर रेल्वे चालते.

यवतमाळ ते मुर्तीजापूर चालणारी हि नैरो गेज लाइन इंग्रजाच्या काळात बनविण्यात आली होती. या काळात सर्व रेल्वेचा कारभार हा ग्रेट इंडियन पेनिन्सुलर रेलवे यांच्या अधिपत्या खाली चालायचा. या सोबतच भारतात चालणार्या इतर रेल्वेसेवेची जवाबदारी याच कंपनी कडे होती. आश्चर्याची गोष्ट हि आहे कि, १९५२ साली झालेल्या रेल्वे राष्ट्रीयकरण दरम्यान या रेल्वेस दुर्लक्षित करण्यात आले. त्यामुळे आजही या रेल्वेवर मालकी हक्क ग्रेट इंडियन पेनिन्सुलर रेलवे यांचा आहे.

शंकुतला रेल्वेची स्थापना १९१० साली ब्रिटीश प्रायवेट फर्म किलिक निक्सन यांच्या द्वारे करण्यात आली. इंग्रजाच्या काळात रेल्वे जाळे वाढविण्याचे काम हे प्रायवेट फर्म कडून होत असे. या कंपनीने ब्रिटीश सरकार सोबत काम करून जॉइंट वेंचर मध्ये सेंट्रल प्रोविंस रेलवे नावाची कंपनि सुरु केली.

आजही शकुंतला रेल्वेला नैरो गेज ट्रैकचा वापर केल्या जातो. यवतमाळ ते अमरावती जिल्ह्यातील अचलपूर हा १९० किमीचा प्रवास पूर्ण करायला शंकुतलास २० तासाचा वेळ लागतो, ज्याचे भाडे १५० रुपये एवढे आहे. या रूट वर रेल्वे दिवसातून फक्त १ वेळेस चालते.

जवळपास १०० वर्ष जुनी हि ५ डब्याची रेल्वे ७० वर्षापर्यंत १९२१ मध्ये मैनचेस्टरमध्ये बनलेल्या जेएडडी स्टीम या इंजिनवर चालली. त्यानंतर १९९४साली हिला डिजल इंजिन बसवावे लागले. या रेल्वे रुळाचा वापर करण्याकरिता भारत सरकारला दरवर्षी ब्रिटीश सरकारला १ करोड रुपये द्यावे लागते.

ह्या नैरो गेज ट्रैकचा उपयोग यवतमाळ ते मुंबई कापूस पोहचविण्या करिता करण्यात येत होता. ह्या रेल्वेस ग्रामीण लोकांची जीवनरेषा सुद्धा म्हटल्या जाते. २०१६ साली मंत्री सुरेश प्रभू यांनी Narrow Gauge ला Broad Gauge करण्या करिता एक १५००करोडचे बिल पास केलेले आहे. त्यामुळे हि रेल्वे भारताच्या स्वाधीन होणार आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *