Breaking News
Home / बातम्या / आजच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवारांनी केल्या ‘या’ १० मोठ्या घोषणा

आजच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवारांनी केल्या ‘या’ १० मोठ्या घोषणा

महाविकास आघाडी सरकारने आज दुसरा अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थमंत्री अजित पवार यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. कोरोनाशी लढत असलेल्या आरोग्य विभागासाठी मोठ्या प्रमाणात तरदूत करण्यात आली आहे. सरकारकडून आरोग्य विभागासाठी ७ हजार ५०० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली.

आज महिला दिनाचे औचित्य साधून अजित पवारांनी महिलांसाठी देखील अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनच्या काळात कृषी क्षेत्रानंच राज्याची अर्थव्यवस्था सावरली. कृषी क्षेत्रासाठी देखील अर्थमंत्र्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत.

आजच्या अर्थसंकल्पातील १० मोठ्या घोषणा-

१. महिलांच्या नावावर घर घेतल्यास आहे त्या मुद्रांक शुल्कात १ टक्के अधिकची सूट मिळणार.

२. पुण्याच्या ८ पदरी रिंगरोडसाठी २४ हजार कोटी निधीची घोषणा, यावर्षीपासून भूसंपादनाचे काम हाती घेतले जाईल.

३. शाळकरी मुलींना मोफत एसटी प्रवास. १५ हायब्रीड बस महामंडळाच्या ताफ्यात येणार.

४. ३ लाखापर्यंत पीककर्ज घेणाऱ्या नियमित वेळेत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार.

५. आरोग्य सेवांसाठी ७५०० कोटींची तरतूद. सरकारी रुग्णालयांत आग रोधक उपकरणे लावण्यात येतील.

६. अत्यंत जुनी मागणी असलेल्या पुणे, नगर, नाशिक २३५ किमीचा रेल्वे मार्ग उभारणार, १६१३९ कोटी मंजूर.

७. सिंधुदूर्ग, उस्मानाबाद, रायगड, साताऱ्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालये उभारणार.

८. एसटी महामंडळासाठी १४०० कोटी रुपयांची घोषणा. परिवहन विभागाला एकूण २५०० कोटी.

९. मुंबईसाठी महत्वाच्या असलेल्या कोस्टल रोडचं काम २०२४ पूर्वी पूर्ण करण्याचा निर्धार.

१०. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचे काम ४४% पूर्ण झाले, ७०० किमी पैकी ५०० किमीचे काम पूर्ण. ५०० किमीचा रस्ता १ मे ला खुला करणार.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *