Breaking News
Home / बातम्या / आजच्या अर्थसंकल्पात रेल्वे, रस्ते आणि वाहतुकीसाठी करण्यात आलेल्या ९ मोठ्या घोषणा

आजच्या अर्थसंकल्पात रेल्वे, रस्ते आणि वाहतुकीसाठी करण्यात आलेल्या ९ मोठ्या घोषणा

आजच्या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. अर्थमंत्री अजित पवारांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात सर्वच घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केल्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले. तर विरोधकांनी मात्र अर्थसंकल्पावर टीका केली आहे. आजच्या अर्थसंकल्पात रस्ते आणि वाहतुकीसाठी देखील अनेक मोठ्या घोषणा झाल्या.

जाणून घेऊया काय आहेत या मोठ्या घोषणा-

१. पुण्याच्या ८ पदरी रिंगरोडसाठी २४ हजार कोटी निधीची घोषणा, यावर्षीपासून भूसंपादनाचे काम हाती घेतले जाणार.

२. मुंबई-गोवा महामार्गाला पर्याय असलेले रेवस-रेडी मार्गासाठी ९५७३ कोटींचा अपेक्षित खर्च करणार.

३. पुणे, नगर, नाशिक २३५ किमीचा रेल्वे मार्ग उभारणार, यासाठी १६१३९ कोटी रुपये मंजूर.

४. ठाण्यात ७५०० कोटींचा वर्तुळाकार मेट्रो प्रकल्प हाती घेणार.

५. अहमदनगर,बीड, परळी, वर्ध्यात रेल्वेमार्गाचे काम वेगाने करणार.

६. नागपूर पुणे समृद्धी महामार्गाचे काम ४४% पूर्ण झाले, ५०० किमीचा रस्ता १ मे ला खुला करणार. नागपूर ते शिर्डी मार्ग १ मे २०२१ रोजी खुला करण्यात येणार.

७. ७००० कोटी खर्चून नांदेड ते जालना २०० किमीचा नवा मार्ग उभारून समृद्धी महामार्गाला जोडणार.

८. गोव्याला जाण्यासाठी ५४० किमीच्या समुद्री मार्गासाठी ९५४० कोटी.

९. ईस्टर्न फ्री वे ला विलासराव देशमुख यांचे नाव.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *