Breaking News
Home / बातम्या / ‘अपना भाई आ रहा है! ’ नक्की काय आहे हे भाई प्रकरण ?

‘अपना भाई आ रहा है! ’ नक्की काय आहे हे भाई प्रकरण ?

बॉलीवूडचा भाई सलमान खान आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा आहे, पण सध्या नेटकऱ्यांमध्ये चर्चा आहे वेगळ्या भाईची. लाखोंच्या घरात followers असलेल्या अनेक Digital Creators नी #ApnaBhaiAaRahaHain हा हॅशटॅग वापरून व्हिडिओ पोस्ट करायला सुरुवात केली आणि हा भाई नक्की आहे तरी कोण ? याची उत्कंठा सगळ्यांच्या मनात निर्माण झाली.

त्याचं झालं असं की 24*7 Road Side assistance देणाऱ्या Auto i Care या नामांकित application ने आपल्या पहिल्यावहिल्या जाहिरातीचा काल टीजर लाँच केला आणि ह्या भाईची चर्चा सर्वदूर पसरली. यामध्ये भाईचा चेहरा स्पष्ट दिसत नसल्यामुळे, नक्की हा नवीन भाई कोण हाच प्रश्न सगळ्यांना पडला आहे.

रस्त्यावर आपली गाडी अचानक बंद पडते आणि आपल्याला असंख्य अडचणींचा सामना करावा लागतो, पण या समस्येवर डोंबिवलीत राहणाऱ्या सागर जोशी या तरुणाने ‘ऑटो आयकेअर’ या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपल्या समोर एका चांगला पर्याय निर्माण केला आहे. ह्या ॲपच्या मदतीने कोणत्याही वेळी, कोणत्याही ठिकाणी तुमची गाडी बंद पडली, तर लवकरात लवकर जवळचे मेकॅनिक तुमच्या येथे पोहोचू शकतील.

आदित्य सातपुते, विशाल फाले, मोहक मनघाणी, RJ सुमित, सायली राऊत, प्रियांका दिवटे यांच्यासारख्या नामवंत Digital Creators नी आपल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर वेगवेगळ्या धाटणीच्या व्हिडिओ त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून पोस्ट केल्या आणि #ApnaBhaiAaRahaHain हा हॅशटॅग ट्रेंडिंग मध्ये आला आणि सगळ्यांच्या मनात ह्या भाई बद्दल उत्सुकता निर्माण झाली.

Advertising क्षेत्रात अगदी थोड्याच कालावधीत आपले नाव उंचीवर नेऊन ठेवलेल्या मुंबई येथील एम्पायर मीडिया या जाहिरात कंपनीचे प्रमुख आशिष शिंदे आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या सर्जनशील डोक्यातून ह्या कल्पनेने जन्म घेतला. कुठेही भाईचा चेहरा समोर न आणता फक्त प्रेक्षकांच्या मनात उत्कंठा निर्माण करून ब्रँडचे प्रमोशन करण्याचा त्यांचा हा प्रयत्न सफल झाला असं म्हणता येईल.

भाईचा चेहरा जरी ब्रँडने दाखवला नसला तरी एका प्रसिद्ध अभिनेत्याची झलक मात्र आपल्याला टीजरमध्ये दिसत आहे. आता थोड्याच दिवसात जेंव्हा Auto i Care संपूर्ण जाहिरात आपल्यासमोर घेऊन येईल, तेंव्हा हा भाई नक्की आहे तरी कोण ? हे कोडे उलघडणार आहे. आणि टीजर इतका धमाकेदार आहे तर संपूर्ण जाहिरात किती धमाकेदार असेल हे तुम्हाला सांगायची गरज नाही.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *