अनंत अंबानीने घातलेल्या या ‘कार्टियर पँथर ब्रोच’ची किंमत एवढी कि तेवढ्या पैशात झाले असते १० लग्न

उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याचा नुकताच साखरपुडा झाला. आता लवकरच तो राधिका मर्चंटसोबत लग्नगाठ बांधणार आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या साखरपुड्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशाच काही छायाचित्रांमध्ये दिसणारा त्याचा ब्रोच यावेळी चर्चेचा विषय ठरला आहे.
अनंत अंबानी याचा साखरपुडा मोठ्या थाटामाटात आणि शाही थाटात संपन्न झाला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या साखरपुड्यात बॉलीवूड कलाकारही उपस्थित होते. त्यावेळी अनंत आणि राधिकाच्या वेशभूषेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
राधिका मर्चंटने एंगेजमेंटसाठी लोकप्रिय डिझायनर अबू जानी आणि संदीप खोसला यांनी डिझाइन केलेला गोल्ड सिल्क टिश्यू घागरा घातला होता. तर अनंत अंबानी यांनी गडद निळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता. त्याच्या कुर्त्यावर परिधान केलेला कोट ‘कार्टियर पँथर ब्रोच’ ने जडलेला होता. अनंतच्या पोशाखापेक्षाही त्याचा ब्रोच मोठ्या चर्चेत होता.
‘कार्टियर पँथर ब्रोच’ प्लॅटिनम किंवा सोन्यापासून बनवलेले असते. हा ब्रोच हिऱ्यांनी जडलेला आहे. तर या पॅंथरचे चमकणारे डोळे पाचूचे बनवले जातात. या पँथर ब्रोचची रचना कार्टियरच्या तिसऱ्या पिढीतील जॅक कार्टियर यांनी १९१४ मध्ये केली होती. या ब्रोचची किंमत 1 कोटी 13 लाख 51 हजार 087 ते 1 कोटी 32 लाख 26 हजार 085 रुपयांपर्यंत असते. अनंत अंबानी याचा ब्रोचही कस्टमाइझ होता. परंतु अनंतने घातलेल्या ब्रोचची किंमत नक्की किती हे अजून समोर आलेलं नाही. त्याच्या ब्रोच किंमतही १ कोटी १३ लाख ते १ कोटी ३२ लाखांच्यामध्ये आहे. एवढ्या पैशात आपल्याकडे १० लग्न थाटामाटात पार पडली असती.
कोण आहे राधिका
राधिका मर्चंटबद्दल सांगायचं झालं तर ती भारतीय उद्योगपती वीरेन मर्चंटची मुलगी आहे. गेल्या वर्षी २९ डिसेंबर रोजी त्यांचा रोका करण्यात आला होता. तर १९ जानेवारी रोजी त्यांचा साखरपुडा झाला. अजूनपर्यंत त्यांच्या लग्नाची तारीख समोर आलेली नाही.
बॉलिवूड सेलिब्रिटींची हजेरी-
मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याचा राधिका मर्चंटशी नुकताच साखरपुडा झाला. हा दिमाखदार सोहळा त्यांच्या अँटिलिया येथील निवासस्थानी पार पडला. यावेळी बॉलिवूडचे अनेक स्टार उपस्थित होते. शाहरुख खानपासून ते रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोणपर्यंत सर्वांनी या सोहळ्याला हजेरी लावली. त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या साखरपुड्यात सहभागी झाला होता. त्याच्यासोबत पत्नी गौरी खान आणि मुलगा आर्यन खान होता. तर रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण अगदी रॉयल लूकमध्ये साखरपुड्याला आले होते. दीपिका लाल साडीत सुंदर दिसत होती, तर रणवीर काळ्या रंगाच्या शेरवानीमध्ये राजबिंडा दिसत होता. सलमान खान त्याची भाची अलीजेहसोबत पार्टीत आला होता. तर बच्चन कुटुंबियांकडून ऐश्वर्या राय- बच्चन तिच्या मुलीसोबत आराध्यासोबत साखरपुड्याला आली होती.