आयपीएलच्या दोन संघासाठी लिलाव होऊन गेला आहे. लखनऊ आणि अहमदाबाद संघाची या वेळी घोषणा करण्यात आली आहे. त्या दोन संघांच्या माध्यमातून बीसीसीआयला मोठ्या प्रमाणावर महसूल जमा झाला आहे. या दोन संघांबद्दल अधिक माहिती जाणून घेण्याची उत्सुकता सर्वानाच लागून राहिली आहे.
अनेकांनी लखनऊ आणि अहमदाबाद संघ घेण्यासाठी बोली लावली होती पण त्यात संजीव गोएंका ग्रुप आणि सीसीव्ही कॅपिटल या दोन कंपन्यांनी बाजी मारल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या दोन संघांची मालकी या दोघांकडे असणार आहे. दोन संघांच्या माध्यमातून आयपीएलच्या सामन्यांना पण मोठ्या प्रमाणावर रंगात येईल.
गोएंका ग्रुपने लखनऊ संघासाठी जवळपास ७ हजार ९० कोटी रुपयांची बोली लावली तर सीव्हीसी ग्रुपने अहमदाबादच्या टीमसाठी ५ हजार ६२५ कोटी रुपयांची बोली लावली आहे. या दोन संघांसाठी कोणत्या दोन व्यक्तींनी एवढी मोठी रक्कम कमावली आणि त्यांचे उद्योग काय आहेत हेच आपण जाणून घेणार आहोत.
लखनऊचा संघ हा आतापर्यंतचा सर्वात महागडा संघ ठरला आहे. या संघासाठी सर्वात जास्त बोली लावली गेली आहे. सात हजार कोटींच्या घरात किंमत असणाऱ्या गोएंका गृपबद्दल अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केल्यावर अनेक नवं नवीन माहिती समोर आली आहे. आरपीएसजी ग्रुपचे अध्यक्ष असलेलं गोएंका हे खूप मोठे उद्योगपती आहेत.
या आधी पण त्यांनी आयपीएल संघ चालवला आहे. त्यांनी पुण्याचा संघ चालवला असून महेंद्रसिंघ धोनी या संघाचा कर्णधार राहिलेला आहे. त्यांनी परत एकदा आयपीएलमध्ये पुनरागमन केले आहे. त्यांनी अदानी ग्रुपला मागे टाकून आघाडी घेतली आहे. त्यांनी आयपीएलच्या माध्यमातून सुरुवात करायला उत्सुक असल्याचे सोशल मीडियावरून म्हटले आहे.