अचानक नातवासह गल्लीतल्या किराणा दुकानात एकनाथ शिंदे आल्यानंतर नेमकं काय घडलं..

मुख्यमंत्रीएकनाथ शिंदेंमधला कार्यकर्ता किंवा लोकांमध्ये मिसळणारा नेता हे बिरुद राज्याच्या प्रमुखपदी असतानाही सातत्याने दिसून येते. गणपती उत्सवात त्यांनी घरोघरी जाऊन कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिले, तर नवरात्रोत्सवादरम्यान त्यांनी ठाण्यातील टेंभी नाका येथेही नवरात्रोत्सवाचा आनंद लुटला.
आता मुख्यमंत्री शिंदे ठाण्यात वाढलेल्या गल्लीत होळीच्या कार्यक्रमासाठी किशननगरमध्ये पोहोचले होते. यावेळी आपल्या नातवासोबत होळीचा आनंद घेत होते. मात्र, नातवाच्या हट्टापायी जवळील एका किराणा दुकानात जाऊन त्यांनी खरेदी केली. सध्या त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल होतोय.
किशननगर येथील होळी उत्सवात मुख्यमंत्री शिंदे आपल्या नातवासह सहभागी झाले होते. यावेळी, मोठा लवाजमा, फौजफाटा आणि कार्यकर्त्यांची गर्दीही त्यांच्यासमवेत होती. मात्र, सोबत असलेल्या नातवाने जवळच्या दुकानातून काहीतरी खरेदी करण्याचा हट्ट धरला. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वत: नातवासोबत जवळच असलेल्या किराणा दुकानात पोहोचले. यावेळी त्यांच्यासोबत मोठी गर्दी होती.
ठाणे – मुख्यमंत्र्यांनी पुरवला नातवाचा हट्ट, गल्लीतल्या दुकानातून केली खरेदी pic.twitter.com/EBzVLdSFm6
— Lokmat (@lokmat) March 7, 2023
अचानक मुख्यमंत्र्यांना त्यांच्या किराणा दुकानात आल्याचे पाहून दुकानदाराला धक्काच बसला. त्याने लहान रुद्रांशसाठी खाऊ पुड्यात बांधून खाऊ दिला. तर, रुद्रांशसाठी दोन चेंडूही मुख्यमंत्र्यांनी खरेदी केली. यावेळी, खासदार श्रीकांत शिंदे यांनी दुकानदाराजवळ येऊन घेतलेल्या मालाचे पैसे दिले.
दरम्यान, होळीनिमित्त ते लहानाचे मोठे झालेले किशननगर येथे गेले होते. यावेळी त्यांचा नातू रुद्राशही त्यांच्यासोबत होता. होळी पेटल्यानंतर रुद्राशने दुकानातून आजोबांकडे काहीतरी घेऊन जाण्याचा हट्ट सुरू केला. अखेर मुख्यमंत्री झालेल्या आजोबांनी नातवाचा हट्ट पूर्ण केला. मुख्यमंत्र्यांच्या या साधेपणाचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.